तुमचं विधान बरोबर आहे. अंधार ही स्थिती आहे आणि प्रकाश ही घटना आहे. अंधार आहेच, प्रकाश निर्माण करावा लागेल; पण अंधार अनिर्मित आहे त्यामुळे प्रकाश संपता क्षणी अंधार घेरून येईल. अर्थात, अंधार आणि प्रकाश हे प्रकाशाचे विभ्रम आहेत. सूर्य कायम प्रकाशमान आहे पण पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र असे विभ्रम होता. थोडक्यात, काल हा प्रकाश विभ्रम आहे आणि त्याची केली जाणारी गणना म्हणजे वेळ ही मानवी कल्पना आहे. वेळ या संकल्पनेचा जगण्यासाठी उपयोग असला तरी वास्तविकात वेळ कुठेही नाही. हा उलगडा मनावर सतत असलेलं वेळेचं दडपण शून्य करतो.आध्यात्मिकदृष्ट्या अंधार आणि प्रकाश या निर्वस्तूत घडणाऱ्या घटना आहेत; पण निर्वस्तू (म्हणजे आपण) स्वयंवेद्य आहोत म्हणजे स्वत:ला जाणण्यासाठी आपल्याला उजेडाची (किंवा अंधाराची) गरज नाही आणि आपण अपरिवर्तनीय असल्यामुळे त्यांचा आपल्यावर कोणताही परिणाम होत नाही.