वेगवान इंटरनेटाच्या युगात पूर्वीच्या पारंपारिक बातम्यामाध्यमांचे महत्व / वलय कमी झाले आहे. सोशल मिडीयामुळे आता जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जरा काही खुट्ट जरी झालं तरी ते लगेच जगभर पोहोचतंय.  व्हायरल होणं हा नवा ट्रेंड रूळलाय आता. 

त्यामुळे पारंपारिक बातम्यामाध्यमांना रोजी रोटी चालू राहण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. त्यामुळेच ह्या असल्या बातम्यांचही पेव फ़ुटलं आहे.

असल्या बातम्या चवीने वाचणाऱ्यांचाही एक वर्ग आहे. त्यामुळे 'मागणी तसा पुरवठा' हाही एक पैलू आहेच.

- (वर्तमानपत्रं वाचणं बंद केलेला) सोकाजी