अप्रतिम लेख चौकस. खरं आहे, त्यांच्याबद्दल पुस्तकातली माहिती वाचणं म्हणजे सूर्याचा फोटो बघण्यासारखंच आहे. ते सुमारे 80 वयाचे असताना त्यांचं सवाई गंधर्व मध्ये गाणं ऐकलं होतं. पहिल्या स्वरापासून (कोमल ऋषभ आसावरी आणि भैरवी) अंगावर शहारा आणि डोळ्यांत पाणी आलं होतं. तिथल्या सगळ्या समुदायाची तीच परिस्थिती होती. त्यापूर्वीही एकदा मुंबईला ऐकलं (पूरिया कल्याण) होतं, तेव्हाही त्यातली परिपूर्णता जाणवली होती.
- कुमार