पुन्हा पुन्हा असे घडत असेल तर  स्पष्टपणे व समजावणीच्या सुरात सांगावे. त्यातूनही तसंच घडत असेल एक दोन वेळा मागल्या पावली त्यांना परत पाठवावं. थोडा वाईटपणा घ्यायला काहीच हरकत नाही. भीड भिकेची बहीण कशाला ? नात्यात घडत असेल मग तर  बोलायला मागेपुढे पाहू नये. असले संबंध हवेत कशाला ? मी असं लिहायला नको,पण उदाहरण म्हणून लिहीत आहे. आमचे एक नातेवाईकांना  केव्हाही येऊन उभं राहायची संवय आहे ‌. बरीच वर्षे झाली.नाते अगदी जवळचे असल्याने बोलता येत नाही. फक्त सहन करतो.