जर सगळं सत्यच असेल तर आपण सत्यापरता कसे असू शकतो ?  हा साधा आणि सरळ विचार तुम्हाला इतका दिलासा देईल की बोलता सोय नाही !

अस्तित्व ही स्वयंचलित प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया ज्या अथांग आणि अविनाशी पोकळीत चालली आहे ती पोकळी हे सर्व चराचराचं मूळ स्वरूप आहे.  

आपण सत्य आहोत हा उलगडाच अमृत आहे, तस्मात, आपल्याला मृत्यू नाही हे लक्षात येतं. 

आहे ते आयुष्य नाकारण्याचा प्रश्न येत नाही. जो खेळ आपल्या बाहेर चालला आहे असा भ्रम होतोय,  त्याला सर्वस्वी व्यापून  आपण अस्पर्शित आहोत इतक्या उघड गोष्टीचं आकलन होणं म्हणजे अध्यात्म !