विवाह ही सर्वस्वी मानवी कल्पना आहे. समाजव्यवस्था सुरळितपणे चालणं आणि जगणं सोयीचं होणं यासाठी विवाह (ही संकल्पना) निश्चितपणे उपयोगी आहे. परंतु विवाह ही वास्तविकता समजल्यानं संसाराचं ओझं झालं आहे. संतमहंत तर त्या भानगडीतच पडत नाहीत किंवा पडले तरी त्यातून बाहेर कसं पडता येईल असा विचार करतात. सांसारिक बंधनातून मोकळं झाल्याशिवाय सत्योपलब्धी असंभव आहे असा सार्वत्रिक गैरसमज आहे. पण लग्नामुळे आपण सत्य आहोत (रंगमंच आहोत) या वास्तविकतेत कणमात्रही फरक पडत नाही.
थोडक्यात, व्यावहारिक दृष्टीनं संसार करताना पुरूष पती (किंवा स्त्री पत्नी) म्हणूनच वागू शकते, त्यासाठी संसार सोडायची गरज नाही. फक्त आपण मुळात पती (किंवा पत्नी) नसून ती पात्रं ज्या संसारात वावरतायत तो रंगमंच आहोत, हे भान सगळ्या जगण्याचा आनंदोत्सव करतं.