सुरेख मुद्दा गंगाधरसुत! 

संजयजींचाही विचार पटला.

अलीकडेच 'अल्केमिस्ट' आणि विशेषत: 'सिद्धार्थ' (हर्मन हेस) ही पुस्तकं वाचली, एक जाणवलं - काळ (आणि तसंच यश) या फक्त कल्पना आहेत. वास्तवाशी त्यांचा संबंध नाही. वास्तव एवढंच आहे की आपण निसर्गनियमाप्रमाणे जन्म घेतो, प्रजनन करतो आणि मरण पावतो. सगळं मातीपासून मातीकडे (किंवा पंचमहाभूतांकडे). माझ्या मते त्या आधी आणि नंतर आपला त्याच्याशी संबंध राहत नाही आणि राहणारच नाहीये. मग यश, पैसा, कीर्ती हा खटाटोप कशाला हवा? जे आहे त्याचा आनंद घ्यावा आणि इतरांना आनंद द्यावा इतकंच.

गंमत वाटते म्हणून (आणि तोवरच) शोध घ्यावा. न घेतला तरी काही बिघडत नाही. जो जे वांछील तो ते लाहो.... 

- कुमार