सरकारी नियमाप्रमाणे खाली दिलेले शब्द दोन्ही पद्धतीने लिहिता येत असले तरी युनिकोडच्या नियमाप्रमाणे कोणता तरी एकच पर्याय स्वीकारावा लागत असल्यामुळे दुसरा पर्याय स्वीकारावा असे माझे मत आहे.

अद्भुत/ अद्‌भुत
महद्भाग्य/ महद्‌भाग्य
श्रीमद्भगवद्गीता/श्रीमद्‌भगवद्‌गीता
उद्भव/ उद्‌भव

फक्त उद्भिज्ज हा शब्द आडव्या मांडणीत उद्‌भिज्‍ज असा दिसला तर कदाचित वाचायला कठीण जाऊ शकेलटंक तयार करणाऱ्यांनी र्‍हस्व भि ची वेलांटी थोडी लांब केली की हा प्रश्न सुटू शकेलअसे शब्द सामान्यांच्या वापरात फार कमी असतात त्यामुळे ती काही मोठी समस्या नाही
_____

एक प्रश्न मला मनोगतच्या प्रशासकांना विचारायचा आहे तो म्हणजे काही शब्द जसेः अन्न रत्न किल्ला लग्न हे उभ्या मांडणीत दाखविण्यासाठी काय करावे? प्रश्न हा शब्द आडव्या मांडणीत 'प्रश्‍न' असा कसा लिहायचा? (सध्या मी इतर ठिकाणाहून कॉपी - पेस्ट करून इथे आणला आहे.) दुसरी गोष्ट म्हणजे इथे वापरलेला फॉण्ट कोणता  आहे?