त्या टंकात ज्या गोष्टी नाहीत त्या समाविष्ट कराव्यात अशा अर्थाचा माझा प्रतिसाद नव्हता. तर त्या टंकाचे इतरांनी अनुकरण करून अनावश्यक जोडाक्षरे काढून टाकावीत असे मला म्हणायचे होते. पानाच्या सोर्स कोडमध्ये तो टंक कसा शोधायचा हे आपण सांगितलेत त्याबद्दल धन्यवाद. पण मी तो टंक माझ्या संकेतस्थळावर (किंवा लिब्रे ऑफिसमध्ये) वापरू शकतो का याबद्दल म्हणजे लायसन्स विषयी काहीच माहिती दिली नाही. मनोगताच्या इतक्या वर्षांचा अनुभवावरून मी असे म्हणू शकतो की तो टंक ओपन सोर्स असण्याची शक्यता खूप कमी आहे. मनोगत या संकेतस्थळाने मराठी भाषेत अनेक मापदंड निर्माण केले. पण ते सर्व संशोधन पडद्याआड राहिल्यामुळे त्याला मर्यादा पडल्या अशी खंत मला काही वेळा वाटते.