४७. जडी बूटी ४७. काष्ठौषधी

४८. सिक्का  ४८. नाणे (एका जाहिरातीत "शिक्का" असा शब्द ऐकलाय.)

४९. प्रयोग ४९. उपयोग. ("पतंजली"च्या वस्तूंची जाहिरात.)

५०. गाढा  ५०. दाट (अक्षयकुमार मोऱ्या धुताना घट्ट असा शब्द वापरतो.)

५१. तुलसी ५१ तुळस (ती "थेरडी" चहापुडीत तुळशी असल्याचं सांगते.)

५२. कब्ज  ५२. बद्धकोष्ठ

५३. गला घोटना  ५३. गळा दाबणे 


१९. दिखावा  १९. ढोंग

(थोडसं सर्व्हिस रोडवर:

हे लिहीत असताना मला त्या बोर्नव्हिटामधल्या पळत्या मुलाच्या आईच्या तोंडचं ते लांबलचक (लंबंचवडं नव्हे, बर का!!) वाक्य आठवलं. अशी वाक्यरचना मराठीत नाही पण त्या "भाषांतरकारा"नं ते जसंच्या तसं भाषांतरित केलंय.) हिंदीतलं ते वाक्य कानाला ठीक वाटतं पण तेच मराठीतलं "व्हर्शन" नको वाटतं. )

पुन्हा महामार्गावर:

५४. चुकाना ५४. चुकते करणे ( चुकविणे नव्हे.)

५५. खिलाना ५५. खाऊ घालणे ( खिलवणे नव्हे.)

५६. मनाना ५६. समजूत घालणे ( मनवणे नव्हे.)