कारण देव ही केवळ मानवी कल्पना आहे.
देह कायम कालबद्ध आहे पण आपण ज्यात देह जन्मतो, वावरतो आणि संपतो ती व्यापकता आहोत हा उलगडा म्हणजे अध्यात्म आहे. ही व्यापकता कालबद्ध नाही.
सध्या आपण देह अधिक व्यापकता आहोत पण प्रत्येकाला आपण केवळ देहच आहोत असं वाटतं त्यामुळे आपला प्रवास मातीतून मातीकडे इतकाच मर्यादित वाटतो, पण वस्तुस्थिती तशी नाही.