आजच्या लोकसत्तेत हा लेख आहे
गृहनिर्माण संस्थांचा लेखापरीक्षण अहवाल मराठीत!
वरवर वाचलेले काही मुद्दे असे:
... मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील ... सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल यापुढे मराठीतून सादर करण्याचा निर्णय ... इंग्रजी भाषेतील वैधानिक लेखापरीक्षण अहवालामुळे संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी यांनाही सदरच्या लेखापरीक्षण अहवालावरून संस्थेच्या आर्थिक स्थितीची तसेच संस्थेच्या गुण-दोषांची वस्तुस्थिती यांबाबत आकलन होण्यास अडचणी निर्माण होतात ... लेखापरीक्षकास मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य ... राज्यातील नागरी सहकारी बँकांचे बहुसंख्य सभासद व ठेवीदार मराठी भाषिक असल्याने या बँकांचे वैधानिक लेखापरीक्षण अहवाल निबंधकांस व बँकेस सादर करताना ते मराठी भाषेत सादर करावेत ....
कळावे.