१. परिणामांपासून मुक्त होतो ,म्हणजे परिणाम फार काळ टिकत नाहीत,असं म्हणायचंय का आपल्याला ?
आपण एखादी टिवी सीरियल पाहतो तेंव्हा तिचा किती परिणाम व्हावा हे पाहणाऱ्याला ती कितपत खरी वाटते (किमान पाहताना तरी) यावर अवलंबून आहे. भावना किंवा विचार हा शारीरिक बदल आहे पण स्वतःला देह समजल्यानं तो बदल आपल्यात झाला असा भास होतो. या आभासापासून मुक्ती म्हणजे परिणाम शून्यता आहे.
२. तसंच सगळंच आणि आपण अपरिवर्तनीय आहोत, मग मुक्तीसाठी प्रयत्न का करायचा ?
मुक्तीसाठी प्रयत्न हाच तर व्यर्थ प्रयास आहे कारण मुक्ती ही वस्तुस्थिती आहे आणि व्यक्ती हा भ्रम आहे. पण हा भ्रम इतका वास्तविक आहे की त्यामुळे मुक्ती हा सायास वाटतो.