माझ्या सायनच्या वास्तव्यात (२००३-२००८) आमच्या घरासमोरच्या इमारतीत गर्बा / दांडिया चालत असे. माझी ३ महिन्याची मुलगी झोपत नाहीये म्हणून सांगायला रात्री ११ च्या सुमारास (साडेदहाच्या नियमानंतर अर्ध्या तासानं) मी तिथे गेलो. त्यावर मला "उसको भी लेके आओ, उसे मजा आयेगा" असं उत्तर मिळालं!
काही ऐकणं / न ऐकणं याचं स्वातंत्र्य मिळायला (आणि विचारक्षमता यायला) अजून खूप प्रबोधन करायची गरज आहे हे मात्र त्यातून लक्षात आलं. याशिवाय आपण मांडलेले राजकीय हेतूंनी प्रेरित मुद्दे वेगळेच.
- कुमार