देवाघरचे ज्ञात कुणाला ?  एक्सप्रेस समूहाच्याच मालकीचे एक वर्तमान पत्र, जे बन्द करण्याच्याच लायकीचे आहे, ते चालू सुरु राहणार, व  लोकप्रभा बन्द पडणार, किंवा बंद पडले. हल्ली त्या वर्तमान पत्रातील मुख्य बातम्या काय असतात ?

१:  'अ' यांचा 'ब' यांना टोला/ टीकास्त्र/ खोचक शब्दात साधला निशाणा. यात 'अ' या करता संजय राऊत/ देवेन्द्र फ़डणवीस/ नाना पटोले/ चन्द्रकांत पाटील/ रोहित पवार / . . . . वगैरे कोणतेही एक नांव; व 'ब' करता याच यादीतील दुसरे कुठले तरी नांव. बरे, यात काही सखोल अभ्यास पूर्ण टीका असते म्हणावे, तर ते ही नाही. काही तरी उथळच.

२: क्रिकेट, आयपीएल 

३: अंद्धश्रद्धा प्रचार : अमूक राशीच्या मुलीशी लग्न केल्यास  पुरुषाचे भाग्य उदयास येते; घरात चुकूनही ठेवू नका या पाच वस्तू; . . .

४: अभिनेत्रींचे 'बोल्ड' फ़ोटोशूट

पण हे वर्तमान पत्र सुरु राहणार, आणि लोकप्रभा बन्द पडणार.


देवाघरचे ज्ञात कुणाला. विचित्र नेमानेम. 
कुणी रखडती धुळीत आणिक, कुणास लाभे हेम