सकाळ या वर्तमान पत्राची पण एक विनोदी पुरवणी शुक्रवारी निघत असे. त्याचे नाव विसरलो पण त्यात एक लेखक, मूळचे डिप्लोमा मेकॅनिकल इन्जीनियर, आयुर्वेद उपचारांच्या नांवा खाली काहीच्याबाही सल्ले देत असत. विनोदाचा एक वेगळा प्रकार. त्याच पुरवणीत विख्यात डॉक्टर ह. वि. सरदेसाई पण एक आरोग्य विषयक सदर लिहीत असत. ते मात्र अधिकारी व्यक्तीने लिहिलेले माहीती पूर्ण लेख असे अणि म्हणून मी ती पुरवणी वाचत असे. काही वर्षां पूर्वी ह. वि. सरदेसाई यांचे निधन झाले, व मग त्या पुरवणीत वाचण्या सारखे काही उरले नाही. "चन्द्र प्रकाशात ठेवून सिद्ध केले औषध" असले तेच तेच विनोद किती दिवस वाचणार ? मग मी ती पुरवणी वाचणे बंद केले. मागच्या वर्षी त्या "डिप्लोमा मेकॅनिकल इन्जीनियर उर्फ़ आयुर्वेदाचार्यांचे पण निधन झाले. आता ती पुरवणी चालू आहे का बंद झाली माहीत नाही.