अगदी योग्य विषय छेडला आहे. लोकप्रभा बंद पडलं हे फार वाईट झालं. अतिशय चांगलं मासिकं का बंद पडलं कळत नाही.‌ सत्यकथा , माणूस ,अमृत ही मासिकं ही अशीच बंद पडली. काहीही असलं तरी लोकप्रभामधे  कोणी ना कोणी चांगले लेखक असायचेच. मध्यंतरी २०१६ मधील माझ्या एका लेखाचे मला २०२१ मधे पैसे  मिळाले. मला वाटतं आपली मराठी माणसं आणि मासिकं कधीही फसवणारी नसतात. हलाखीत दिवस काढतील पण फसवणार नाहीत. एखादं साप्ताहिक, पाक्षिक,  वृत्तपत्र अथवा मासिकं बंद पडणं मला अयोग्य वाटतं.. लोकाश्रय नाहीसा झाला असंच म्हणावं लागेल. आता लोकप्रभाची जागा कोण भरून काढणार काय माहीत ?. लिखाणात चूक असल्यास क्षमस्व.