लोकप्रभा साप्ताहिक बंद पडले, हे वाचून फार दुःख झाले. असंख्य आठवणी आहेत. अगदी शालेय वयापासून मी हे साप्ताहिक वाचत आलो आहे. 'बहर' हे राजेंद्र बर्वे यांनी लिहिलेले सदर, अरूण घाडीगावकर यांचे नाट्यपरीक्षण मला आवडत असे. रश्मी घटवाई नावाच्या एक लेखिका या साप्ताहिकात लिहीत होत्या. हे साप्ताहिक विविध विषयांना वाहिलेल्या पुरवण्या प्रकाशित करत असे. १९९६ मध्ये  साप्ताहिकात गझलेचे सदर होते. त्यातील गझलांची निवड सुरेश भट करीत.