माझे व्यक्तिगत मत असे आहे की, मराठीत डब करायला हरकत नाही. त्यातून ( मला तरी ) पुढील फायदे दिसतात.
१. स्वतःच्या भाषेत चित्रपट पाहायला मिळेल. (ओठांची हालचाल वेगळी असली तरीसुध्दा हरकत नाही. इंग्रजी चित्रपट दाक्षिणात्य भाषेत डब होतात तेव्हाही हालचाल वेगळी असते व ही गोष्ट संबंधित भाषक समूहाने स्वीकारलेली असते. कालांतराने मराठी समूहही स्वीकारेल, अशी आशा आहे.)
२. डबिंग कलाकारांना व तंत्रज्ञांना उदरनिर्वाहाचे साधन मिळेल.
३. एकदा ही गोष्ट मोठ्या स्वरुपात सुरु झाल की, त्या भाषेचा दबाव चित्रपटसृष्टीवर तयार होईल. मराठी लोक हिंदीत डब केलेले सिनेमा नाकारतात, त्यांना त्यांच्या भाषेतील सिनेमा लागतो, अशी प्रतिमा तयार होईल व ते हितावह असेल.
४. सिनेमा कादी दिवसांनी वाहिनीवर येतो. ज्यावेळी असा सिनेमा वाहिनीवर येतो, त्यावेळी दुस-या वाहिनीवर हिंदी किंवा इंग्रजी चित्रपट लागलेला असेल तर मराठीप्रेमी माणूस स्वभाषेची निवड करेल, अशी शक्यता आहे.
टीपः मराठीत डब झालेल्या सिनेमामुळे इतर मराठी चित्रपटांवर परिणाम होईल, असे (आत्ता तरी) वाटत नाही.