"उद्या समजूतदारपणे मुसलमानांनी डेसिबलचे नियम पाळत अजान देण्याचे पाऊल उचलले किंवा मशिदींवरचे भोंगे उतरवले..." ही मांडणी 'मुसलमान आज समजूतदार नाहीत आणि डेसिबलचे नियम पाळीत नाहीत' या निष्कर्षाला फार तर्कशुद्ध करून टाकते. त्याची गरज नाही.
मी ती मांडणी "आज कोणीच समजूतदार नाही नि डेसिबेलचे नियम पाळीत नाही; मुसलमान त्यांपैकीच एक!" अशी वाचली. (त्या मांडणीत उलट मी "उद्या मुसलमानांनी जर समजूतदारपणे डेसिबेलचे नियम पाळीत अजान देण्याचे पाऊल उचलले, किंवा मशिदीवरचे भोंगे उचलले, तर समजूतदारपणात किंबहुना ते एक पाऊल पुढेच ठरतील! (मग भले आज असोत वा नसोत.)" असा अर्थ वाचला. लेखकाला बहुधा हाच अर्थ अभिप्रेत असावा.)
अर्थात, वाटेल त्याचा वाटेल तसा अर्थ (सोयिस्करपणे? खोडसाळपणे?) लावण्याचे वाचकाचे स्वातंत्र्य लक्षात घेता, आपण म्हणता तसा अर्थ कोणी (अनेकांनी?) लावण्याची भीती सार्थ आहेच म्हणा! परंतु, नेमकी हीच शक्यता लेखकाचा मुद्दा अधोरेखित करीत नाही काय?