माझ्या 'पु. ल. अखेरचा अध्याय' आणि 'कॅस आला रे आला' या कथा त्यावेळी त्यात प्रसिद्ध झाल्या होत्या - २००३ च्या सुमारास.
'देशभक्ती'ची व्याख्या कोणीशी 'एखाद्या देशात केवळ आपला जन्म झालेला असल्याकारणाने तो देश महान आहे, अशी (चुकीची) समजूत' अशी केलेली आहे. तद्वत, एखाद्या पुरवणीत केवळ आपले लेख प्रसिद्ध झालेले आहेत, म्हणून ती पुरवणी थोर, असा काही दावा आहे काय?
(ठीक आहे, ती पुरवणी थोर होती, असा दावा (निदान उघडपणे तरी) कोठेच केलेला नाही, हे मान्य आहे. मात्र, 'कसली भिकार पुरवणी होती हो! त्यात माझेसुद्धा लिखाण छापून आले होते!' असे म्हणण्याचा हेतू निश्चित नसावा, असे आपले बुवा मी तरी गृहीत धरले. असो.)
त्याच हिशेबाने जायचे झाले, तर 'मनोगता'वर कधीकाळी माझेही लिखाण छापून आलेले आहे. म्हणजे, 'मनोगत'सुद्धा थोरच असले पाहिजे, नाही काय?
असो चालायचेच.