डबिंगला तत्त्वत: विरोध नाही, परंतु, डबिंगचा दर्जा काय आहे, त्यावर अंतिम परिणाम(कारकता) अवलंबून राहील, असे वाटते.

(डब केलेल्या चित्रपटात, मूळ चित्रपट कितीही उत्कृष्ट असला, तरीही, डबिंगचा दर्जा जर भिकार असेल, तर प्रचंड रसभंग होण्याचा धोका नेहमीच असतो, असे वाटते.)

(वर श्री. चेतन पंडित यांनी व्यक्त केलेली भीती ही (निदान हिंदीतून मराठीत डब केलेल्या चित्रपटांच्या बाबतीत तरी) अनाठायी वाटते. (दूरदर्शनवरील वगैरे) हिंदीतून मराठीत डब/अनुवादित केलेल्या जाहिरातींचा दर्जा ('रिन - थोडीशी!') लक्षात घेता, आशेस भरपूर वाव आहे, असे म्हणावेसे वाटते. (चूभूद्याघ्या.))