इंग्रजीप्रमाणे मराठीतही वर्णविपर्यास करणे शक्य आहे. इंग्रजीत व्यंजने आणि स्वर वेगवेगळे लिहिल्यामुळे त्या प्रत्येकाचे एकेक अक्षर होते, त्यामुळे वर्णविपर्यासासाठी पुष्कळ पर्याय उपलब्ध होतात. मराठीत स्वराचे काने, मात्रा, वेलांट्या आणि जोडलेली अर्धी अक्षरे असे सगळे मिळून एकेक 'अक्षर' होत असते. त्यामुळे वर्णविपर्यस्त रूपे तयार करताना तुलनेने फार कमी पर्याय राहतात.

ह्यामुळे इंग्रजी वर्णविपर्यास करणे तुलनेने सोपे आणि ओळखणे तुलनेने अधिक कठीण, तर मराठी वर्णविपर्यस्त रूपे तयार करणे तुलनेने कठीण तर ओळखणे तुलनेने अधिक सोपे ठरते.

मराठी वर्णविपर्यासाचे एक उदाहरण:

पवार - परवा - वापर

... आणखीही उदाहरणे शोधणे शक्य आहे.