ऍनाग्रम  "बनवायचे" नसतात. शब्द संग़्रहा मधे ते असतातच, ते फ़क्त "शोधायचे" असतात. इन्ग्रजीत ऍनग्राम शोधण्या करता एक स्टेप आहे, ती म्हणजे शब्दाची सर्व अक्षरे अलफाबेटिकल ओर्डर मधे लिहायची. याला काय म्हणतात ते मी विसरलो, सोयीखातर आपण याला शब्दाचा 'क्ष' करणे असे म्हणू. ज्या शब्दांचा 'क्ष' एकच असेल, ते शब्द ऍनाग्राम आहेत. उदाहरणार्थ 

LIME या शब्दाचा 'क्ष' EILM असा होईल, आणि MILE या शब्दाचा 'क्ष' पण तोच होईल. जर डिक्शनरी मधील सर्व शब्दांचे 'क्ष' केले, आणि त्या यादीत कोण कोणते 'क्ष' सेम आहेत हे शोधले, तर त्या 'क्ष' चे मूळ शब्द ऍनाग्राम आहेत असे सहज दिसून येईल. हे काम संगणाका वर एक प्रोग्रम लिहून करण अगदी सोप आहे, व अनेकांनी केले आहे. मराठीत पण हे करता येईल पण मराठी करता असा प्रोग्राम लिहिणे खूप कठीण आहे.