मा. पंडित,

विवेचनाबद्दल धन्यवाद. पण हे क्ष केल्यानंतर जे शब्द मिळतात ते सगळेच अर्थपूर्ण असतातच असे नाही. तसे अर्थपूर्ण शब्द मिळविण्यासाठी  पुन्हा ते सगळे शब्द शब्दकोषातल्या शब्दांशी ताडून पहावे लागतील.

दुसरं, तसं करून देणारी संकेतस्थळंही बरीच आहेत. असो.

पण, हे इंग्रजी शब्दांबद्दल झालं. माझा प्रश्न, मराठी शब्दांबाबत होता. आणि थोडा वेगळा होता. मला असं विचारायचं होतं की मराठीत शब्दांचे अनग्रॅम करताना, किंवा तुमच्या भाषेत, "शोधताना" काने, मात्रे, वेलांट्या, उकार, अनुस्वार, विसर्ग आणि इतर प्रत्यय हेदेखील सुटे सुटे करायचे की नाही. उदा.

रोचक ह्य शब्दात (र), (एक काना+एक मात्रा), (च) आणि (क) अशी व्यवस्था आहे. तर ह्यातून, अनग्रॅम बनवताना, काना मात्रा सुटा सुटा घ्यावा की काना-मात्रा हा एकसंध घ्यावा?. असाच प्रश्न, इतरांबाबतीत.