संजोप राव,
प्रथम, बोलट/जनार्दन नारो शिंगणापूरकर च्या उल्लेखाबद्दल विशेष अभिनंदन. पुलंच्या ध्वनिमुद्रित व्यक्ती आणि वल्लीच हल्ली लोकांच्या जेमतेम लक्षात असतात. बापू काणे, गजा खोत सारख्या अनेक प्रत्येकाच्या अनुभवास आलेल्या आणि पुलंनी योग्य न्याय दिलेल्या वल्ली बऱ्यांच जणांना माहिती नसतात याचं वाईट वाटतं. चालायचंच.
हॅप्पी भाग जायेगी, अर्शद वार्सी असे अनेक चित्रपट, नट मलाही अतिशय आवडून गेलेत. अनेक सहायक नटांचे संवाद असेच अजूनही आठवतात. लेखक माहिती नव्हता पण तुम्ही अतिशय सुरेखरित्या त्याचं लेखन कसं आहे ते सांगितलं आहे. हे पुस्तक वाचायला हवं.
- कुमार