मराठीत स्वराचे काने, मात्रा, वेलांट्या आणि जोडलेली अर्धी अक्षरे असे सगळे मिळून एकेक 'अक्षर' होत असते.
माझ्या लहानपणी, माझ्या शाळेतून घरी येण्याच्या मार्गावर एक मोठा जाहिरातफलक (होर्डिंग) असे. त्यावर मोठ्या अक्षरांत 'पर्गोलॅक्स. जुलाबाच्या गोड गोळ्या.' अशी जाहिरात असे.
आम्ही (वात्रट) मुले ती जाहिरात (मुद्दाम) 'पर्गोलॅक्स. गुलाबाच्या जोडगोळ्या.' अशी वाचत असू.
तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे वर्णविपर्यासाचे/अॅनाग्रामचे उदाहरण नाहीये तर.
ठीक आहे, समजू शकतो. शेवटी, लक्ष्मणरेषा कोठेतरी आखलीच पाहिजे.
पण मग, हे नक्की काय आहे?