शब्दांची व्युत्पत्ती तपासताना उच्चारांच्या अश्या अनेक जोड्या बघायला मिळतात. उदा. 'ज' चा 'य' किंवा उलट. 'ब' - 'व', 'म'- 'व' त्यामध्येच 'स' चा 'ह' झाल्याची अनेक उदाहरणे सापडतील.
उदा.
सेमि (=अर्ध उदा. सेमिसर्कल) - हेमि (उदा. हेमिस्फिअर)
सरस्वती - हरस्वती (संदर्भ:झेंड-अवेस्ता हे उदाहरण मी केवळ ऐकलेले आहे. शहानिशा केलेला नाही. तपशीलातील चुकांबद्दल चू.भू. द्या. घ्या.)
साडेसात - हाडाहात (कच्छ) हे देखील मी केवळ ऐकलेले उदाहरण आहे.
मराठीतही सत्तरनंतरच्या संख्यांमध्ये सत्तर ऐवजी हत्तर वापरले जाते.
एकाहत्तर, बाहत्तर इ.
सप्त(=७) (सं) हफ्त (फार्सी किंवा हिंदीत आपण हफ्ता हा शब्द ऐकलेला असतोच.) चू. भू. द्या. घ्या.