सिनेमा "न बघण्याचा" ऑप्शन असतो,  आणि हा ऑप्शन अगदी फ़ुकट असतो. म्हणजे, सिनेमा "न बघण्या" करता तुम्हाला कोणतीही परवानगी लागत नाही, पैसे खर्च करावे लागत नहीत. हीच ऑप्शन, "न बघण्या"ची, टीव्हीच्या सर्व कार्यक्रमां करता पण उपलब्ध आहे. सास-बहू मालिका, १० वर्षे पर्यन्तच्या वयोगटालाच रुचतील असे विनोद असलेले हास्य-कार्यक्रम; कर्कश स्वरात, एका वेळी किमान तीन लोकांनी बोललेच पाहिजे असा नियम असलेले वाद-विवाद; गायना वर लक्ष देण्या ऐवजी आपण दिसतो कसे या वर सर्व लक्ष केन्द्रित करून गाणारी शाळकरी मुले, व त्यांच्या गायनाला मेलोड्रॅमटिक अभिनय करून दाद देणारे तथाकथित परिक्षक; . . . .  हे सर्व कार्यक्रम "न बघण्या"ची ऑप्शन आहे. मी ही ऑप्शन पुरेपूर वापरतो. तुम्हीही वपरून बघा.