"न बघण्याचा" ऑप्शन असतो, आणि हा ऑप्शन अगदी फ़ुकट असतो.

नेहमी ऑप्शन मिळेलच असे नाही. घरात इतरजण बघतात. दुसऱ्या कुणाकडे गेल्यावर बघायला लागते. नुसत्या बातम्याही इतक्या दरडावून आरोळ्या देत दिलेल्या असतात की अगदी टी व्ही बंद केला तरी दुसऱ्या घरातल्या टीव्हीचा आवाज कानावर आदळतोच. कुठे गेले की कार्यक्रमावर चर्चा होते, तिच्यात भाग घ्यावा लागतो.

कुठला बॉम्बस्फोट असो किंवा सैनिकांनी अतिरेक्याचा फडशा पाडलेला असो की मार्केट यार्डात आंब्यांची आवक असो,. बातम्या सांगताना कसलीतरी आग लागल्यासारखी बोंबलत ठणकावत ती बातमी सांगितली जाते. मासळी बाजार बरा.

ह्या लोकांना घशाचे रोग होत नाहीत का?