माझ्या मित्र-मंडळीत एक जण टीव्ही मालिकेतील कलाकार आहे. एकदा आम्ही सगळे मित्र जमलो असताना त्याला सगळ्यांनी खडसावले. "कसल्या भिकार मलिका बनवता तुम्ही, प्रेक्षकांना काय मूर्ख समजता का", वगैरे. त्याने शान्त पणे उतर दिले
"मालिका बनविणारे तुम्हाला मूर्ख समजत नाहीत. तर, त्या मालिका रोज बघून तुम्हीच स्वत: मूर्ख आहात हे शाबित करता. आम्ही उत्तम कलाकृती बनविण्या करता मालिका बनवीत नाही. हा सगळा पैश्याचा खेळ आहे. लोक ज्या मालिका बघतात त्यांचा टीआरपी वाढतो; टीआरपी वाढला कि त्याला जहिरातदार मिळतात; जहिरातीतून पैसा मिळतो. तुम्ही बघणे बन्द करा, त्यांना पैसे मिळणे बन्द होईल, मालिका पण बंद होतील."