केवळ पैसा मिळविण्याच्या उद्देशाने चालवलेल्या 'तद्दन व्यावसायिक' कंपन्याही मधून मधून उत्तम दर्जेदार कलाकृती सादर करतात. असे करण्यात त्यांचा काय उद्देश असावा? हे लिहिताना भारताच्या बाहेरच्या एचबीओ सारख्या संपूर्ण गल्लाभरू वाटणाऱ्या कंपनीनेही अनेक दर्जेदार चित्रपट सादर केलेले आहेत असे आठवते. किंवा एखाद्या व्यावसायिक पुस्तक प्रकाशन आस्थापनानेही मधेच एखादे चांगले दर्जेदार पुस्तक बाजारात आणल्याचे दिसते. असे करण्यात त्यांना काही व्यावसायिक फायदा लगोलग होत असेल असे वाटत नाही; मात्र काहीतरी फायदा होतच असणार (नाहीतर कोण कशाला उगीच पैसे वाया घालवील?)

असे भारतात झाल्याचे पाहिले आहे का? (ही केवळ चौकशी आहे. ... 'असे पाहायला मिळत नाही' असे सुचवण्याचा उद्गारवाचक प्रयत्न नाही.)

प्रेक्षकांची अभिरुची उंचावण्यासाठी उदाहरणे म्हणून मधून मधून त्यांनी अशा कलाकृती सादर केल्यातर त्यातून त्यांना काही धोका वाटत असावा का?