वैशाली पेंडसे-कार्लेकर यांचा भाषासूत्र या सदरातील लेख लोकसत्तामध्ये जून ९, २०२२ रोजी प्रसिद्ध झाला असून त्यात माझ्या मताशी मिळतेजुळते मत मांडले गेले आहे. त्या म्हणतात १३ क्रमांकाच्या लेखननियमानुसार 'लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी अशी बोलण्याची भाषा घालावी. अन्य प्रसंगी ही रूपे एकारांत लिहावी' असं सांगितलं आहे. आज आपण सगळय़ासाठी तशी भाषा वापरतो. त्याचबरोबर, बदलते आहे- बदलतेय, गेली आहे- गेलीय- गेलेय, बोलतो आहे- बोलतोय अशा प्रकारचे मराठीतले संधिशब्द सध्या लेखनामध्येही मोठय़ा प्रमाणावर वापरले जात आहेत या सर्वाची दखल लेखनाच्या नियमांचा विस्तार करताना घ्यायला हवी.
https://tinyurl.com/mvt2pbu8