दक्षिण भारतातून एक इंग्रजी साप्ताहिक प्रकाशित होत असे. ते चाळण्याची मला १९७१ ते १९७५ ह्या काळात संधी मिळाली. त्यात एका व्यंगचित्रफितीत 'जोसेफाइन' हे पात्र असायचे. एकही शब्द नसायचा. फितीचे नावही जोसेफाइन असेच होते. जोसेफाइन घरकाम करताना काय काय अफलातून युक्त्या करते ते दाखवत असत. दोन तीन चित्रे एका चित्रफितीत असत. मला वाटते ते व्यंगचित्र कुठल्यातरी ब्रिटिश प्रकाशनाकडून घेतलेले असावे.
मी हे व्यंगचित्र शोधण्याचा नंतर खूप प्रयत्न केला; पण मला मिळाले नाही. जोसेफाइन हे पात्र असलेली इतर व्यंगचित्रमालिका सापडली मात्र ती वेगळी होती.
आता ही व्यंगचित्रे चाळून ते सापडते का पाहिले पाहिजे.