खाली दिलेल्या तीन पर्यायातील कोणता पर्याय वाचायला सोपा वाटतो?
अन्न अन्‍न अन्‌न
अग्नी अग्‍नी अग्‌नी
स्नान स्‍नान स्‌नान
पत्नी पत्‍नी पत्‌नी
प्रश्न प्रश्‍न प्रश्‌न
स्वप्न स्वप्‍न स्वप्‌न
चिह्न चिह्‍न चिह्‌न
विघ्न विघ्‍न विघ्‌न
महिम्न महिम्‍न महिम्‌न
तद्नंतर तद्‍नंतर तद्‌नंतर

माझ्यामते क्रमांक दोनचा म्हणजे मधला पर्याय योग्य वाटतो. मनोगतावर वापरलेल्या टंकामध्ये मला  केवळ प्रश्न , स्वप्न आणि चिह्न हे तीनच शब्द उभ्या मांडणीत दिसत आहेत. पण इतर ठिकाणी (उदा. मायबोलीवर) हे शब्द कॉपी पेस्टकरून आपण पाहू शकतो की उभी मांडणी वाचायला खरोखरच कठीण आहे.