असे आणखी काही शब्दः
उद्धव उद्धव उद्धव
उद्घाटन उद्घाटन उद्घाटन
विद्या विद्या विद्या
द्रव द्रव द्रव
अद्दल अद्दल अद्दल
उद्भव उद्भव उद्भव
पद्म पद्म पद्म
उद्गार उद्गार उद्गार
विद्वान विद्वान विद्वान
उद्बोधक उद्बोधक उद्बोधक
तद्नुसार तद्नुसार तद्नुसार
यातील द्रव, विद्या, अद्दल असे शब्द सोडले तर इतर सर्व शब्द दुसऱ्या कॉलममध्ये लिहिल्याप्रमाणे वाचायला काही त्रास होणार नाही असे मला वाटते. अरुण फडके यांनी आपल्या कार्यशाळेत दुसऱ्या कॉलमचा निषेध करून पहिल्या कॉलममध्ये लिहिल्याप्रमाणेच लिहावे असा (जोरदार) आग्रह धरलेला होता असे युट्युबवरील व्हिडिओमधून मला समजले. मी काही या विषयातील तज्ज्ञ नाही. युनिकोडच्या दृष्टीने काय अडचणी आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.