शाळेत ए.सी.सी. नि कॉलेजात एन.सी.सी., यातून बाहेर पडलेले विद्यार्थी तसेच स्काऊट, रास्वसं, सेवादल यासारख्या संस्थातून बाहेर पडलेली अनेक मुले आज समाजात आहेत. या सर्वांमध्ये रास्वसं स्वयंसेवक आपले वैशिष्ट्य जोपासणारे दिसतात. तशा पद्धतीने अग्निपथाने प्रशिक्षित केलेले अग्निवीर जर राष्ट्रीय विचार मनात ठेवून समाजात वावरू लागले तर निश्चितच समाजाचा कस वाढलेला दिसेल! तथापि, एक धोका संभवतो की अतिरेकी विचाराने भारलेले जिहादी युवक यामार्गाने घुसून राष्ट्राच्या सुरक्षिततेला धोका ठरू शकतील.