सर्वप्रथम ज्याला/जिला भविष्यसूचनाबद्दल मदत पाहिजे त्याने तिने इंटरनेट बॅंकिंग वापरून एक हजार रुपये ऍप्लिकेशन फी भरावी लागते. आणि आपला खाते क्रमांक नि इंटरनेट बॅंकिंगचा आलेला ओटीपी ईमेलने कळवावा लागतो. खाते क्रमांक, ओटीपी आणी ईमेलवरचा टाईमस्टॅंप हे तीन आकडे एका सूत्रात (सूत्र सांगण्याची परवानगी व्यवस्था देत नाही, क्षमस्व) घातले की जे उत्तर येते त्यातून एक हजार वजा केले की येणारी संख्या धन असेल तर पुढे जायला मिळते. शून्य वा ऋण संख्या आली तर तो दिवस (आणि तुमचे हजार रुपये) वाया गेले.
हे सर्व आपण विडंबनाने लिहिले आहे किंवा उपरोधाने लिहिले आहे असे दिसते. पण त्याची भाषा काहीजणांना न समजता ते हे सर्व गंभीरपणे घेण्याचा धोका दिसतो.
माझे काही चुकले असल्यास सांगावे.