नमस्कार टग्या साहेब,
आपण विचारलेली शंका नीट समजली नाही. आपण "पिसाळलेले” हे विशेषण ज्यांना लावले आहे ते म्हणजे "लोकमान्य टिळक” आपल्याला अभिप्रेत आहेत का? तसे असेल तर त्यांचा मृत्यू होऊन १०० पेक्षा जास्त वर्षे होऊन गेली आहेत. (ऑगस्ट १, ‎इ.स. १९२०) युनिकोडवरील चर्चेत "लोकमान्यांचे चावणे" अप्रस्तुत आहे असे मला वाटते. पण आपण जी भाषा वापरत आहात त्यावरून आपला या विषयातील व्यासंग खूप मोठा असावा असे वाटते. कृपया सविस्तर प्रतिसाद देऊन तुमचे विचार समजावून सांगाल का?