अरुण फडके यांनी खाली दिलेले चार शब्द आडव्या मांडणीत न लिहिता उभ्या मांडणीतच लिहिले पाहिजेत या विषयी फार सुंदर विवेचन केले आहे.
शुद्ध
अद्वितीय
पद्मश्री
द्वंद्व
त्यांच्या मते हे शब्द असे लिहावे.
शुद्ध
अद्वितीय
पद्मश्री
द्वंद्व
आपण यूट्युब चॅनलवर ही चर्चा पाहू शकतो.
मराठी लेखन कार्यशाळा - भाग पहिला - प्राथमिक काळजीचे शब्द - भाग २
१) या शब्दांत दोन पदे नाहीत. त्यामुळे उत् + धव = उद्धव असे लिहिण्याची नियमानुसार मिळणारी सूट नाही.
२) द्वि या जोडाक्षरात वि ची ऱ्हस्व वेलांटी द पर्यंत पोहोचत नाही. कोणत्याच फाँटमध्ये हे जोडाक्षर नीट दिसत नाही.
३) या जोडाक्षरांचा उच्चार करताना अनावश्यक "पॉज" घेतला जातो जो चुकीचा आहे. उदा. मुले 'द्वंद्व' शब्दाचा उच्चार 'दवदव' असा करतात.
४) सरकारने आदेश काढूनदेखील बालभारती ऐकत नाही.
५) ही दोन अक्षरे एकमेकांना जोडलेली नसल्यामुळे ती जोडाक्षरे आहेत असे वाटतच नाही.
हे पाचही मुद्दे अगदी बरोबर आहेत. आणि तरी देखील बालभारती जर हे शब्द असेच लिहीत आणि छापत असेल तर ते माझ्यामते बरोबर आहे!