भाऊसाहेब रंगारी यांनी लो. टिळकांच्या दोन वर्ष अगोदर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली असा कोणीतरी दोनहजार सतरा साली वाद उकरून काढला होता, असे पुसटसे आठवते.
बाकी, कथा आवडली. आमच्या लहानपणी आमची आजी सांगायची. पार्वतीमाता स्नान करतेवेळी वजरीने ( हातपाय घासण्याचा लहानसा खरबरीत दगड) हात-पाय घासता घासता, हाता-पायाच्या मळापासून ( मळ कसं तरी वाटते) अशी मूर्ती बनवली त्यात प्राण भरला आणि त्याला सांगितलं की लक्ष ठेव आत कोणाला येऊ देऊ नको. मग पुढील ष्टोरी सेम टू सेम. पण, कालौघात हे मळाचे चंदनाचा लेप कधी झाले कळलेच नाही. मळाची कथा स्कंदपुराणात आहे म्हणतात. संदर्भ तपासले नाही.
कथा क्रमांक दोन. ( विकिसंदर्भ) शिवपुराणात एकदा थेट शंकर विनापरवानगीने नंदी द्वारपाल असताना त्याच्या अडवणुकीला झुगारून त्यांनी स्नानगृहात प्रवेश केला. पार्वतीला त्यांचं वागणे काही पटले नाही. राग आला आणि मग मैत्रिणी, जया आणि विजया यांच्या सांगण्यावरून त्यांनी चिखलापासून एक मूर्ती तयार केली आणि त्यात प्राण फुंकला बाकी ष्टोरी सेम टू सेम.
बाकी, अजून खूप कथा आहेत. मला मोहक गणेशाचे रूप आवडते. अजून काही माहिती मिळाली, काही आठवण झाली तर, या ध्याग्यात येईन. मला कथा, दंतकथा आवडतात.
सर्व मनोगतकरांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे