अरूण फडके यांच्या ऍपप्रमाणे "बुद्धिबल" ऱ्हस्व पण "बुद्धीबळ" हा शब्द दीर्घ, तर मनोगताच्या शुद्धिचिकित्सकानुसार तो पहिला म्हणजे "बुद्धिबळ" असा हवा. इथल्या शुद्धलेखन तपासणीनुसार "मंत्रि", "बुद्धि" असे शब्द जोडशब्दात पूर्वपदावर आल्यास  ते कायम ऱ्हस्वच असायला हवे. माझ्यामते हेच बरोबर असून फडकेसाहेबांचे म्हणणे तर्कसंगत वाटत नाही. मनोगताचे प्रशासक यावर काही प्रकाश टाकू शकतील का?