डोळ्यांना दिसतंय आणि आपल्याला ते कळतंय. कानांना ऐकू येतंय आणि आपल्याला ते कळतंय. त्वचेला स्पर्श होतोय आपल्याला तो कळतोय.

ज्याप्रमाणे आपण चालत नाही, देह चालतो आणि आपल्याला ते कळतं अगदी त्याच प्रमाणे.


पण, असं असूनही "हे" सगळं झालंय किंवा होतंय हे जाणवणंदेखील महत्त्वाचं आहे, ते ज्याला जाणवतं ते "आपण", असंच ना?

हे एकदम बरोबर आहे. 

त्यामुळे फंडा असा आहे : जिथे घडतंय तिथे कळण्याची शक्यता शून्य (म्हणजे देहाला, देह चालतोय हे कळण्याची शक्यता शून्य) आणि जिथे कळतंय (म्हणजे आपण) तिथे काही घडण्याची शक्यता शून्य.

त्यामुळे मृत्यू देहाला येईल, आपल्याला ते कळेल पण आपण मरण्याची सुतराम शक्यता नाही.