मराठीतील 'श’ आणि 'ल’ साठी भविष्यात नवीन युनिकोड संकेतांक आणले गेले तर ....
तसे नको. ती अक्षरे वेगळी नाहीत. नवे संकेतांक म्हणजे अनेक ठिकाणी गोंधळ होऊ लागेल.
फाँटमध्ये ही अक्षरचिह्ने बनवून पर्यायी म्हणून ठेवलेली असतात आणि भाषेप्रमाणे ती वापरायची सोय एचटीएमेल पानात करता येते. मनोगत, लोकसत्ता आदि संकेतस्थळाच्या एचटीएमेल ची सुरवातीची ओळ पाहिल्यास त्यात lang="mr" असा उल्लेख दिसेल. तो त्यासाठी वापरला जातो.