तुमचे उत्तर पटण्यासारखे आहे.

मात्र जालावर शोध घेताना मी एक पथ्य पाळतो. अशा शोधातून जी पाने मिळतात त्यांचे स्रोत काय आहेत ते मी तपासून पाहतो. प्रसिद्ध वर्तमानपत्रांतील अग्रलेख, विश्वकोशातील पाने इत्यादी पानांवरचे शब्दांचे वापर मला शुद्धलेखनाच्या संदर्भात अधिक विसंबनीय वाटतात.