दक्षता साधली की व्यक्तीमत्व उरत नाही. पण भाषेत , मला स्वरुपाचा उलगडा झाला असं म्हणाव लागेल. म्हणजे मी नाही दक्षताच आहे ही वस्तुस्थिती कर्ता, कर्म क्रियापद या नियमात कशी बसवणार ? अव्दैतात वाक्य कसं बोलणार ?
दक्षताच आहे , मी नाही असं म्हटल्यावर मग सांगणारा कोण आहे हा प्रश्न उरतोच । त्यामुळे शब्दांचा मोह सोडावा लागेल कारण दक्षता उच्चारण पूर्व स्थिती आहे. अर्थात, ती उच्चारणानं बदलत नाही पण आकलनासाठी उच्चारण अनिवार्य आहे .