प्रशासक महोदय,
दखल घेतल्याबद्दल धन्यवाद.
'कोणताही प्रतिसाद निवडू नका' ही सोय करण्याने नेमके काय साधणार ते कळले नाही. कृपया खुलासा करावा.
जेंव्हा एखादा लेख/चर्चा वाचायला जातो तेंव्हा काही प्रतिसाद अंगभूतरीत्या (बाय डिफॉल्ट) निवडलेले असतात. वाचकाला समजा एखादा विवक्षित प्रतिसाद वाचायचा असेल तर सगळ्या प्रतिसादांची निवड काढून टाकावी लागते. टिचक्यांची संख्या अकारण वाढते.
===
महोदय,
'सगळे प्रतिसाद निवडा' ही सोय न करण्याचे धोरण ठेवलेले आहे.
ही सोय केली तर जुने लेख वाचताना विशेष उपयोगी येईल असे वाटते. जुने लेख वाचताना अंगभूतरीत्या काही प्रतिसाद निवडलेले असतात. जर का सगळे ८५ प्रतिसाद वाचायचे असतील आणि फक्त ५-१० निवडलेले असतील तर ८०-७५ टिचक्या माराव्या लागतील.
आपल्या याबाबतच्या धोरणामागचे कारण समजू शकेल काय?