केदार,

लेख आवडला. 'मराठी कादंबरीची वाटचाल' या शीर्षकाचं एक पुस्तक मी लहानपणी वाचलं होतं. तिच्यात हरिभाऊ आपटे ते अगदी ह. मो. मराठे यांच्या कादंबऱ्यांची समीक्षा होती. 'दुर्दम्य' (गाडगीळ) चा भाग एकच तेव्हा (ते पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा) आलेला होता.

हरिभाऊ आपट्यांच्या कादंबऱ्या (पण लक्षात कोण घेतो, वज्राघात, सिंहगड, कालकूट) मी तेव्हा वाचल्या होत्या. त्यांची आठवण झाली. पण त्याच्या आधीचा लेखनाचा इतिहास माहिती नव्हता. 

'रारंगढांग' ही प्रभाकर पेंढारकरांची कादंबरी मला आवडली होती.

अशा अनेक गोष्टी पुन: आठवल्या. धन्यवाद!

- कुमार