वाचकाला समजा एखादा विवक्षित प्रतिसाद वाचायचा असेल तर सगळ्या प्रतिसादांची निवड काढून टाकावी लागते.
एखादा प्रतिसाद वाचायचा असेल तर त्या त्या प्रतिसादाच्या शीर्षकावर टिचकी मारताच तो तो प्रतिसाद तेवढाच सेवादात्या कडून तुमच्या यंत्रावर येईल आणि उघडेल. त्यासाठी इतर प्रतिसादांची निवड काढण्याची गरज नाही. साधारणपणे गेल्या चोवीस तासातले प्रतिसाद एकदम उघडता यावेत हे ह्या सोयीमागचे प्रयोजन आहे.
८५ प्रतिसाद .... धोरण
हे सर्व एकदम उघडण्याची आवश्यकता नाही. एकावेळी एकेक प्रतिसाद उघडावा आणि वाचून झाल्यावर मिटावा. प्रतिसाद मिटलेले असताना पान भरभर पुढे सरकते. ८५ प्रतिसाद उघडलेले असताना पान पुढे सरकायला अतिशय त्रासदायक विलंब लागतो.
शिवाय पुष्कळजण 'सगळे' प्रतिसाद उघडू लागले तर सेवादात्यावर अतिरिक्त (आणि सगळे प्रतिसाद सगळ्यांना पूर्ण वाचायचे नसल्याने अनावश्यक) बोजा पडू शकतो, ते टाळले आहे.