जनता पक्षाच्या कारकीर्दीत मधू दंडवते रेल्वेमंत्री असताना पुणे मुंबई जनता एक्स्प्रेसची दुमजली सिंहगड एक्स्प्रेस झाली.... ती भारतातली पहिली दुमजली रेल्वेगाडी. त्याच वेळी मुंबईतली एक नऊ डब्यांची लोकल पुणे-लोणावळा ह्यादरम्यान सुरू केली गेली. त्यावेळी ती लोकल कर्जतहून लोणावळ्याला आणताना कशी तिची सर्व इंजिने चालू ठेवली होती ... इ. तपशील पेपरातून आलेला होता. .. तेव्हा एकदा लोणावळ्याला एका फलाटावर एका बाजूला दुमजली सिंहगड एक्स्प्रेस आणि दुसऱ्या बाजूला युनिट लोकल लावलेली पाहून फारच 'अप्रूप' वाटले होते ... त्याची आठवण झाली.